in the police department juniors are promotion  
नागपूर

ज्येष्ठांना सोडून कनिष्ठांना ‘ठाणेदारी’?; ज्युनिअर जोमात, सीनिअर कोमात 

अनिल कांबळे

नागपूर : नागपूर पोलिस आयुक्तालयात निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादीच तयार नसल्यामुळे शहरात ठाणेदारी देताना भेदभाव होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. वरिष्ठांना डावलून कनिष्ठ अधिकाऱ्यांना ठाणेदारी देण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठांना ‘साइड पोस्टिंग’ला काम करावे लागत असल्यामुळे पोलिस दलात नाराजीचा सूर आहे. याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मनातील खदखद व्यक्त केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य पोलिस दलातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या आयुक्तालयात नियमांप्रमाणे पोलिस निरीक्षक दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी दरवर्षी तयार करण्यात येते. त्यावरून सेवेत ज्येष्ठ असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना कार्यकारी पदावर किंवा वरिष्ठ ठाणेदार म्हणून नियुक्त केले जाते. यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यास आपापली सेवाज्येष्ठता यादीतील क्रमांक लक्षात राहतो. 

त्यानुसार दिलेल्या पदावर समाधान व्यक्त करीत कामही केले जाते. तसेच आपल्यापेक्षा सीनिअर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कामही करण्यात येते. मात्र, अनेकदा सेवाज्येष्ठता यादीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येते. त्याचा फायदा ज्युनिअर अधिकारी घेतात. वरिष्ठांच्या डोळ्यांत धूळफेक करीत ठाणेदारी मिळविण्यासाठी आटापिटा करतात. 

तसेच गुन्हे शाखेत वर्णी लागावी म्हणून नानाविध क्लृप्त्या करतात. आयुक्तालयातील लिपिक वर्गापासून ते मुख्यालयातील बाबूपर्यंत सेटिंग करतात. त्यामुळेच कनिष्ठांना ठाणेदारी मिळते, तर सेवाज्येष्ठ अधिकाऱ्यांना डावलण्यात येते, असा नाराजीचा सूर साइड पोस्टिंगला काम करीत असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आहे.
 

अनेकांची असते ‘सेटिंग’

आतापर्यंत सेवाज्येष्ठता यादीकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत होते. आता स्वच्छ प्रतिमेचे पोलिस आयुक्त नागपूर शहराला मिळाले आहेत. तसेच त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना स्वतःच्या नेतृत्वात पारदर्शक बदली प्रक्रिया पार पाडली आहे. गेल्या काही वर्षांत आयुक्तालयात ‘मखलाशी’ करणाऱ्यांनाच ठाणेदारी आणि गुन्हे शाखेत स्थान मिळत होते. मात्र, आता हा प्रकार खपवून घेतल्या जाणार नाही, असे संकेत मिळाले आहेत.
 
 

पारदर्शक कारभारावर भर 
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यावर सध्या भर दिला जात आहे. नुकताच पदभार स्वीकारला असून सेवाज्येष्ठता यादीबाबत माहिती घ्यावी लागेल. लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभारावर आम्ही भर देत आहोत.
-अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, नागपूर

संपादन  : अतुल मांगे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump यांना मध्यावधी निवडणुकांपूर्वी मोठा धक्का; लोकप्रियता ३१ टक्क्यांवर, डेमोक्रॅट्सना आघाडी

Jharkhand Flying Institute: भावी वैमानिकांना मिळणार ॲपल आयपॅड; प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

IND vs NZ 1st T20: भारत-न्यूझीलंडचा पहिला टी-२० सामना कुठे अन् कधी पाहता येणार? LIVE Streaming, वेळ अन् TV चॅनेलची माहिती जाणून घ्या

Uttar Pradesh Teachers: दिव्यांग व विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांना डिजिटल बळ; ८ लाखांहून अधिक शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण

Pune News: ‘सकाळ’च्या जनसंपादकपदी अंकित काणे यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT